
पुळुज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक १५ ऑगस्ट पासून उपोषणास बसणार:-लिंगराज शेंडगे
(भाजपा उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे यांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना विविध मागण्यांसाठी निवेदन सादर!)
पंढरपूर तालुक्यातील पूजेतील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गेल्या दोन ते तीन वर्षापासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ऑपरेशन थेटर बंद असल्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
या आरोग्य केंद्रासाठी पुळुजवाडी, शंकरगाव, आंबेचिंचोली, नळी, फुलचिंचोली, विटे, सरकोली, पोहरगाव यांसह आदी गावांचा समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी सकाळी दहा वाजता येत असून दुपारी तीन नंतर दवाखाना बंद असतो या परिसरामध्ये चंद्रभागा नदी जात असल्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या पूर्व भागाला असणाऱ्या या गावातील शेतकऱ्यांना सर्पदौंष,पिसाळलेली जनावरे चावतात परंतू त्याची लस देखील उपलब्ध नसते व आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटर सुद्धा बंद अवस्थेत आहे.
यामुळे या ग्रामिण भागातील गोरगरीब नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे. या सर्व गंभीर समस्या सोडविण्यासाठी तात्काळ संबंधितांना आदेश द्यावेत असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री मा.नामदार प्रकाश अबिटकर यांना भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे यांनी दिले आहे.
या सर्व सेवा पुळुज आरोग्य केंद्रामध्ये मिळत नसल्याने या परिसरातील निगरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी वरील सर्व मागण्यांचा विचार करून प्रार्थमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी हजर राहण्यास आदेश द्यावेत अन्यथा 15ऑगष्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनादिवशी पुळुज प्रार्थमिक आरोग्य केंद्रासमोर आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहोत असा इशारा ही भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे यांनी दिला आहे.