
फलटण- पंढरपूर रेल्वे लाईनसाठी पुरूंदावडेची २१ हेक्टर जमीन डीपीआर मध्ये समाविष्ट करणा-यासाठी रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री सतीश कुमार यांना प्रस्ताव!
फलटण-पंढरपुर रेल्वे लाईनसाठी माळशिरस तालुक्यातील महामार्गालगतच्या जमिनींची मोजणी होणार:भानुदास सालगुडे पाटील
फलटण-पंढरपूर रेल्वे लाईन साठी माळशिरस तालुक्यातील हायवेलगतच्या जमिनींची मोजणी व रेल्वे खात्याला ती जमीन ताब्यात देण्यासाठी ऑगस्ट अखेर पूर्ण होणार असून त्यासंदर्भात पंढरपूर रेल्वे स्टेशन मोठे गोडाऊन आहे पण पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविकांची वर्षभर गर्दी असते आणि अनेक वेळा रेल्वे खात्याला सिमेंट युरिया मटेरियल व साखर गोडाऊन मध्ये साखर साखर लोड करणे व अन लोड करणे हे जिकेरीचं काम होत आहे.
त्यामुळे मध्य रेल्वे मुंबईचे जनरल मॅनेजर यांच्या विनंतीवरून पर्याय जागा म्हणून पुरूंदावडे गावात शासनाची जमीन किंवा शेती महामंडळाची जमीन ६० एकर ही ह्या कामासाठी उपयोग होईल व पुरूंदावडे येथे मोठे जंगशन व गोडाऊन बांधता येईल व साखर कारखान्याला सुद्धा जवळ असल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी येईल त्यामुळे पुरूदांवडे येथे ए ग्रेड रेल्वे स्टेशन व मोठ कार्यालय तसेच रेल्वे खात्याला रहिवासीचे बांधकाम व गोडाऊन बांधण्यासाठी महामार्गा लगतसाठी जमीन देण्यासाठी मुंबईला व रेल्वे बोर्डाची चेअरमन श्री सतीश कुमार यांना प्रस्ताव पाठवलेले आहे व मुंबई येथील चीफ इंजिनियर यांच्या बरोबर चर्चाही केलेली आहे. फलटण पंढरपूर रेल्वे लाईनची जुनी जागा सोडून १७५ हेक्टर अतिरिक्त जमीन लागणार आहे त्यामुळे त्या जमीनी बरोबर पुरूंदावडेची pl number Prundavde Ghat No 226, 227, 228, & 229 of MSFC अशी २१ हेक्टर जमीन डी पी आर मध्ये प्रस्तावित करण्यासाठी विनंती केलेली आहे.
त्यामुळे रेल्वे खात्याला महाराष्ट्र शासनाने १९५हेक्टर जमीन अतिरिक्त मागणी महाराष्ट्र शासनाकडे करणार आहेत. या प्रस्तावाला पुरूंदावडे, सदाशिवनगर, तामशीदवाडी, जाधव वाडी व भांबुर्डे व या सर्व ग्रामस्थांची सहमती देखीव दर्शवली आहे. त्यामुळे या प्रस्तावाला विद्यमान व माजी खासदार व आमदार यांनी याबाबत लक्ष देऊन सहकार्य करावे जेणेकरून या भागातील लोकांना रोजगार मिळेल हा भाग विकसित होईल असे मत फलटण पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे भानुदास सालगुडे पाटील यांनी व्यक्त केले आहे.