विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार मिळवून दिला : बाळू गोणे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर (प्रतिनिधी): हजारो वर्षांच्या गुलामगिरीला झुगारून माणसाला माणूस म्हणून समान अधिकार मिळवून देण्यासाठी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला लढा हा जगाच्या इतिहासातील मोठी क्रांती म्हणून गणली जाते. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर मार्गक्रमण केल्यास समाजातील सर्व समस्या संपून जातील असे प्रतिपादन जनहित असंघटीत कामगार संघटनेचे संस्थापक -अध्यक्ष बाळू गोणे यांनी व्यक्त केले.
जनहित असंघटीत कामगार संघटनेच्यावतीने अंबिका नगर भाग -1, कुमठा नाका येथील कार्यालयात 06 डिसेंबर विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक गौतम रिकीबे, माहेश्‍वरी सेल्स अ‍ॅन्ड सर्व्हिसचे अमित लब्बा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास राजू सोलनकर, आनंद मसळी, सोमनाथ माडगे, धनराज चंदनशिवे, भैय्या चंदनशिवे, कोळी मिस्त्री, कांबळे मिस्त्री, विजू बिराजदार, हंचाटे मॅडम, यांचेसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, नागरिक, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनहित असंघटीत कामगार संघटनेचे पदाधिकारी व संचालक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दयानंद शिवशरण यांनी केले तर आभार राजू सोलनकर यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here