
युटोपियन शुगर्सचे संस्थापक चेअरमन मा. श्री. उमेश (मालक) परिचारक यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.
युटोपियन शुगर्सचे संस्थापक चेअरमन मा. श्री. उमेश (मालक) परिचारक यांचे वाढदिवसानिमित्त १०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान:- रोहन परिचारक)
कचरेवाडी ता. मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा. श्री. उमेश (मालक) परिचारक यांचे वाढदिवसानिमित्त दि. 29/07/2025 रोजी अक्षय ब्लड सेंटर व युटोपियन शुगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, अक्षय ब्लड सेंटरचे डॉ. उदय पाटील, जनसंपर्क अधिकारी सागर जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी युटोपियन शुगर्स चे सर्व अधिकारी, खाते-प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. सदर च्या शिबिरात १०१ रक्त दात्यांनी सहभाग घेतला.
यावेळी बोलताना रोहन परिचारक म्हणाले की, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्या युटोपियन शुगर्सद्वारे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्त दान हे श्रेष्ठ दान असल्याने अशा प्रकारचे शिबीर आयोजित करणे हे कौतुकास्पद आहे. रक्तदान हे एक असे दान आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. रक्तदान हे एक सामाजिक जबाबदारीचे काम आहे आणि ते प्रत्येक निरोगी व्यक्तीने करायला हवे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा. श्री. उमेश (मालक) परिचारक यांना दीर्घायुष्य लाभावे अशी मी श्री. रुक्मिणी-पांडुरंग व श्री. संत दामाजी यांच्या चरणी प्रार्थना करतो व शुभेच्छा देतो. तसेच उपस्थित रक्त-दात्यांचे आभार मानतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ई.डी.पी मॅनेजर अभिजीत यादव यांनी मानले.