
पंतप्रधान राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना रेशन धान्य मिळण्यासाठी प्रयत्न करणार:-रमेश माने
(महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कडे विविध मागण्यांचे निवेदन सादर)
मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त कुटुंबांपैकी ज्या रेशन कार्ड धारकांना “पंतप्रधान राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने” अंतर्गत मोफत धान्य मिळत नाही, अशा वंचित लाभार्थ्यांसाठी रेशन धान्य मिळावे यासाठी महसूल मंत्री मा. ना. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री जयकुमार (भाऊ) गोरे
यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी मा. श्री कुमार आशीर्वाद व तहसीलदार मा. श्री सचिन मुळीक यांनी गावात प्रत्यक्ष जाऊन सर्वे करण्यासाठी मंडल अधिकारी ,तलाठी ग्रामसेवक रेशन दुकानदार यांना आदेशित केलं आहे.त्याप्रमाणे आज प्रथम पेनुर गावामध्ये सर्वे चालू आहे.
यामध्ये या सर्वेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून,गावातील सर्व वंचित लाभार्थ्यांनी आपल्या आधारकार्ड, रेशन कार्ड झेरॉक्स व मोबाईल नंबरसह ग्रामपंचायत कार्यालयात किंवा नमूद ठिकाणी उपस्थित राहावे असे आव्हान मोहोळ भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष रमेश माने यांनी केले आहे.
या मागणीसाठी भाजपा राज्य परिषद सदस्य व भारतीय दलित महासंघाचे नेते श्री. संजीव (दादा) खिलारे आणि भाजपा मोहोळ दक्षिण मंडल तालुकाध्यक्ष मा. रमेश माने (मोहोळ) यांनी महसूल व पालकमंत्र्यांकडे सदर मागणीचे निवेदन सादर केले होते.
त्याच्या परिणामस्वरूप सर्वेक्षण सुरू झाले असून जे कुटुंबे सध्या एकत्रित रेशन कार्डवर आहेत पण प्रत्यक्षात विभक्त राहत आहेत, त्यांची विभागणी करून दोन्ही कुटुंबांना स्वतंत्र लाभ देण्यात येणार आहे. विभागणी नंतर संबंधित कुटुंबांना पंतप्रधान आवास (घरकुल) योजनेचा लाभ ग्रामविकास मंत्री मा. श्री जयकुमार जी (भाऊ ) गोरे साहेब यांच्या विभागामार्फत देण्यात येणार आहे.
हा निर्णय म्हणजे वंचित, भटके, गरीब कुटुंबांच्या न्यायहक्कासाठी भाजपा नेत्यांचा दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे उदाहरण आहे.
भाजपाच्या प्रयत्नांतून आता गरीबांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचतो आहे असे मत भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष रमेश माने यांनी व्यक्त केले.