
न्यु सातारा कॉलेज येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी!
न्यु सातारा कॉलेज कोर्टी येथे दिनांक 25 जुलै 2025 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळक हे भारतीय जनतेच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी होते असे यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी संस्थेचे उपप्राचार्य विशाल बाड यांनी ही टिळक एक थोर समाजसुधारक, पत्रकार, आणि शिक्षक म्हणूनही ओळखले जातात असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सुरज जैयस्वाल सर यांनी केले