कोल्हापूर विधान परिषदेसाठी भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून, अमल महाडिक यांची उमेदवारी निश्चित!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून भारतीय जनता पार्टी कडून कोल्हापूर विधान परिषदेसाठी कोण उमेदवार याची मोठी उत्सुकता लागली होती ती उत्सुकता आता संपली असून, महादेवराव महाडिक यांचे सुपुत्र माजी आमदार अमोल महाडिक यांचे नाव

भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून फायनल करण्यात आले असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजत असून यासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक नावे समोर आली होती त्यामध्ये राहुल आवाडे, सुरेशराव हळवणकर, प्रा.जयंत पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शोमिका महाडिक, याचबरोबर अनेक नावांची यावेळी चर्चा झाली. पण नावावर शिक्कामोर्तब होत नव्हते.

अखेर सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्य महानगरपालिका तील व नगरपालिका तील नगरसेवकांचे संख्याबळ पाहता व 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अखेरच्या टप्प्यांमध्ये माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पाणी पाजणार आहे अमल महाडिक, यांची उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाकडे निश्चित करण्यात आली आहे.

यासंदर्भात माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक सुरेशराव हाळवणकर महादेवराव आप्पा महाडिक याचबरोबर राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी माजी आमदार अमल महाडिक यांना ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून समजत आहे व या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालेले सुद्धा अनेक जाणकार व तज्ञ राजकीय मंडळींनी सांगितले आहे. यामध्ये मागील निवडणुकांची पार्श्वभूमी पाहता, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना पराभूत करण्यासाठी भाजपाकडून अमल महाडिक यांना ताकद व बळ देण्याचे काम करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकी कडे अखेर भाजपने माजी आमदार अमल महाडिक यांचे नाव निश्चित केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here