टाकळी सिकंदर ते पुळूज रस्त्यावर धुळीचे साम्राज्य!
रस्त्यावरील धूळीमुळे शेतकऱ्यांच्या फळ बागा, द्राक्ष बागा धोक्यात!
हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन पुकारू :सुनील दादा चव्हाण
टाकळी सिकंदर ते पुळुज या रस्त्याचे काम सुरू असून अद्याप रस्ता पुर्ण झाला नाही यामुळे रस्त्यावर धूळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या रस्त्यावर वाहनांची वाहतूक मोठ्याप्रमाणात आहे. यामुळे धूळीचा फुफाटा निर्माण होतो. यामुळेच टाकळी सिकंदर ते पुळूज रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या ऊस, द्राक्ष,डाळींब,लिंबोळी आशा एक ना अनेक फळ बागांवर धूळीची चादर ओढली गेली आहे.
या फळ बागांवर धूळीची चादर ओढावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. एकीकडे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर फळ बागांना पाणी कमी प्रमाणात मिळत असल्याने पिके जळत आहेत अशात रस्त्यावरील धूळी मुळीमुळे शेतमाल, पिके,द्राक्षे,फळ बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.
टाकळी सिकंदर ते पुळूज हा लवकरात लवकर डांबरीकरण पूर्ण करावा हा रस्ता डांबरीकरण न झाल्यास यासाठी आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा भाजपाचे तालुका अघ्यक्ष सुनील चव्हाण यांच्याकडून देण्यात आला आहे.
चौकट
गेली ०६ ते ०७ महिने झाले टाकळी सिकंदर ते पुळुज या रस्त्याचे खडीकरण केले आहे. या रस्त्या संदर्भात भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांनी वारंवार संबंधित रस्त्याचे ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर व मोहोळ येथील संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष भेटून व पत्रव्यवहार करून व तोंडी सांगून सुद्धा या गोष्टीकडे या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण या भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून संबंधित रस्त्याचे ठेकेदार यांना सार्वजनिक विभागाचे अधिकारी पाठीशी घालत आहेत.या रस्ता व आधिकार-यांच्या गलथान कारभारासंदर्भात पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तक्रार केली तरी याबाबत येत्या ०२ ते ०३ दिवसात रस्त्याचे काम न सुरू केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मोहोळचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांनी दिला आहे.
सुनिलदादा चव्हाण
तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी