दामाजी कारखान्यावर स्व।रतनचंद शहा यांचे १०५ व्या जयंतीनिमीत्त अभिवादन!
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व्हाईस चेअरमन स्व.रतनचंद शहा शेठजी यांच्या १०५ व्या जयंतीच्या निमीत्ताने दामाजी कारखाना कार्यस्थळावरील पूर्णाकृती पुतळ्यास रतनचंद शहा बँकेचे चेअरमन श्री राहूल शहा यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बँकेचे संचालक किसन गवळी, चंद्रशेखर कौंडूभैरी, मुझप‹फर काझी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अघ्यक्ष प्रथमेश पाटील, सागर गुरव, राहूल
चौगुले उपस्थित होते.
याप्रसंगी अभिवादन करताना श्री राहूल शहा म्हणाले,अडचणींना तोंड देत संत दामाजी साखर कारखान्याची उभारणी संस्थापक चेअरमन
स्व.किसनलाल मर्दा वकील आणि संस्थापक व्हाईस चेअरमन स्व.रतनचंद शहा शेठजी
यांनी केली. सदर कारखाना उभारणीपूर्वी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना
इतर कारखान्यांनवा ऊस गळीतासाठी पाठवताना मानसिक त्रास होवुन अडचणी होत
होत्या. तालुक्याला साखर कारखान्याची गरज असलेचे ओळखून सभासद-शेतक-यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने स्व.मर्दासाहेब व स्व.शहा साहेब यांनी हा कारखाना उभा केला. तालुक्याच्या विकासासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. विद्यमान चेअरमन श्री शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात व संचालक मंडळ यांनी या कारखान्याचे कामकाज
आदर्शवत ठेवले आहे. या संचालक मंडळाने सभासद-शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार यांची बिले वेळेवर दिल्याने तालुक्यातील शेतकरी समाधानी दिसत आहेत. तसेच कर्मचारी वर्गाच्या पगारी व असणारी देणी वेळेवर दिलेली आहेत.
सर्व घटकांच्या अडचणी सोडवुन कारखान्याची प्रगती होताना दिसत असलेचे शहा यांनी सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय, चिफ इंजिनिअर सचिन गुंड, शेती अधिकारी कृष्णात ठवरे, चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, कार्यालयीन अधिक्षक दगडू फटे, लेबर ऑफिसर आप्पासोा शिनगारे,
स्टोअरकिपर उत्तम भूसे, ईडीपी मॅनेजर मनोज चेळेकर, पर्चेस ऑफिसर संदिप इंगोले, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे तसेच विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.