आमदार अभिजीत पाटील यांनी घेतली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेची भेट
माढा शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स ची यासाठी निधी मिळावा आमदार पाटील यांची मागणी
माढा विधानसेभेचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे याची मुंबई येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे पत्र दिले. माढा येथे जिल्हा परिषद जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी आवश्यक निधी मिळावा याकरिता ग्रामविकास मंत्री ना.श्री.जयकुमार गोरे साहेब यांना निवेदन दिले.
माढा शहरामधील जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये २मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार झाल्यावर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व अनेकांना रोजगार उपलब्ध होईल.
तसेच जागेतील आतील बाजुस क्लासरूम व शाळेसाठी वॉल कंपाऊंड तयार करणे ही गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक निधी मंजुर करण्यात यावा,अशी मागणी केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.