ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या १११ व्या पुण्यतिथीनिमित्त भाळवणीत गुलालाचा कार्यक्रम संपन्न!
(यावेळी श्री महाराजांच्या पालखीची गावातून मिरवणूक)
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी देवी सभा मंडपात ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या १११व्या पुण्यतिथी निमित्त गुलालाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून महाराजांच्या पादुकाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राच्या जयघोशाने परिसर मंत्रमुग्ध झाला होता.यावेळी भजनी मंडळीनी जागर केला.
यावेळी सरपंच रणजीत जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंढरपूर तालुका महिला अध्यक्षा राजश्री ताड,सलीम तांबोळी,आनंद देशपांडे,राजाभाऊ शिंदे,महादेव कोले,बाळू कलढोणे,सदाशिव वाघमारे,अक्षय म्हेत्रे,विलास कोले,नागनाथ निराळी,जीवन बोधे,धनंजय धोत्रे,राजाभाऊ ताड,सतीश साळवे,प्रशांत माळवदे,गजानन माने,बंडू वेदपाठक,सारंग शहाणे,गणेश मायनकर ,संजय कोले आदि ग्रामस्थ व भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी जय भवानी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले.यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.