श्री संत दामाजी साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात २९ दिवसात १ लाख मे.टन गाळप पूर्ण:चेअरमन श्री शिवानंद यशवंत पाटील
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर
कारखान्याचे चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये २९ दिवसांत १ लाख मे.टन ऊस
गाळप शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी पूर्ण झाल्याची माहिती
कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद यशवंत पाटील यांनी दिली.तसेच सरासरी साखर उतारा हा ९.३२% असा मिळाला आहे. चालू गळीत हंगामात सर्व सभासद, ऊस
पुरवठा करणारे शेतकरी, ऊस तोडणी व वहातूक ठेकेदार, मजूर, अंतर्गत
ठेकेदार, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी या
सर्वांच्या योगदानातून इतक्या कमी दिवसात दामाजी कारखान्याने १ लाख गाळप
पूर्ण केलेले आहे. ऊस तोडणी यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरलेने कारखान्याचे
रोज सरासरी ३७०० ते ३९०० मे।टन प्रतिदिन प्रमाणे गाळप होत आहे. चालू गळीत हंगामामध्ये ५.०० लाख मे.टनाचे गाळपाचे उध्दिष्ट ठेवुन तयारी केली आहे.
कारखान्याचे सर्व सभासद बंधुनी आपला ऊस दामाजी कारखान्याचे गळीतासाठी
देवुन प्रगतीसाठी योगदान द्यावे. संचालक मंडळाने ठरविलेले गाळपाचे उद्षि्ट निश्चीतच पूर्ण करणार असलेचा विश्वास व्ह.चेअरमन श्री.तानाजीभाऊ
खरात यांनी सदर प्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे,राजेंद्र चरणूकाका पाटील , भारत बेदरे, दयानंद साेंनगे, औदुंबर वाडदेकर,रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार,दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर,प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय, खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित
होते.