कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडील मागील हंगामात उशिरा आलेल्या ऊसाचे ऊस विकास अनुदान व निडवा अनुदान बँकेत जमा!
(मार्च २०२४ मध्ये गाळप झालेल्या ऊसास प्रती मे.टन रक्कम रु.३०००/- अदा)
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांने मागील गळीत हंगाम 2023-24 मध्ये उशिरा येणाऱ्या ऊसास ऊस विकास अनुदान व निडवा ऊस अनुदान जाहीर केले होते. ” बोले तैसा चाले ” या उक्तीप्रमाणे आज रोजी कारखान्याने ऊस विकास अनुदान व निडवा ऊस अनुदान बँकेमध्ये वर्ग केले असून त्याची एकूण रक्कम रु. 4.50 कोटी ऊस उत्पादकांना जास्तीची मिळाली असून त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. कारखान्याकडे 16 जानेवारी नंतर, फेब्रुवारी आणि मार्च 2024 मध्ये गाळप झालेल्या ऊसास अनुक्रमे प्रती मे.टन रक्कम रु.50/-, 100/- आणि 150/- याप्रमाणे ऊस विकास अनुदान आणि याव्यतिरिक्त गत हंगामात गाळप झालेल्या निडवा ऊसास प्रती मे.टन रक्कम रु.100/- प्रमाणे अनुदान बँकेत वर्ग केले आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी दिली. यावेळी व्हा.चेअरमन मा.श्री. कैलास खुळे, संचालक आणि कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी माहिती दिली की, गत हंगामात कारखान्याने ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या उशिरा तुटणाऱ्या ऊसास अनुदान जाहीर केले होते. त्याप्रमाणे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऊस विकास अनुदानाची रक्कम व निडवा ऊस अनुदान प्रती मे.टन रक्कम रु.100/- प्रमाणे बँकेत वर्ग केली असल्याने सभासद शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, मागील गळीत हंगाम 2023-24 मध्ये दि.16/01/2024 नंतर आलेल्या ऊसास प्रती मे.टन रक्कम रु.50/- ज्यादा म्हणजे एकूण रक्कम रु.2900/- व दि.01/02/2024 ते दि.28/02/2024 मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रती मे.टन रक्कम रु.100/- जादा म्हणजे रक्कम रु.2950/- आणि दि.01/03/2024 पासून हंगाम बंद होईपर्यत आलेल्या ऊसास प्रती मे.टन रक्कम रु.150/-जादा म्हणजेच रक्कम रु. 3,000/- याप्रमाणे रक्कम मिळालेली आहे. याव्यतीरीक्त ज्या शेतकऱ्यांचा निडवा ऊस कारखान्याकडे गाळपास आला त्या शेतकऱ्यांना प्रती मे.टन रु.3100/- पर्यंत रक्कम मिळाली आहे. कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी जाहीर केल्याप्रमाणे उशिरा येणाऱ्या ऊसाचे ऊस विकास अनुदान व निडवा ऊस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कारखान्याची विश्वासर्हता दृढ झाली असून कारखान्याकडे ऊस गाळपास देण्यासाठी कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील शेतकरी मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास खुळे, संचालक श्री.दिनकरराव मोरे, श्री. उमेशराव परिचारक, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री. बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.लक्ष्मण धनवडे, श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.हणमंत कदम श्री.सुदाम मोरे श्री.विजय जाधव, श्री.किसन सरवदे, श्री.शामराव साळुंखे, श्री.सिताराम शिंदे, श्री.राणू पाटील, तज्ञ संचालक श्री.दाजी पाटील, श्री.दिलीप गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.