शहाजीबापूंच्या प्रयत्नातून माण, निरा उजवा कालवा, म्हैसाळ योजनेचे पाणी
सांगोला तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी अविरत प्रयत्न केले आहेत. नीरा उजवा कालव्याचे पाणी, माण नदीत टेंभूचे पाणी, म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्यात आणण्यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. त्यांच्या या कार्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
नीरा उजवा कालव्याचे पाणी सांगोल्यासाठी
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नामुळे सांगोला तालुक्याला नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी पहिल्यांदाच मिळाले आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निरेचे पाणी टेलपर्यंत मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
या प्रकल्पाचे स्वरूप नेमके काय आहे त्यावर एक नजर टाकुया..
1977 साली या प्रकल्पास मंजुरी मिळाली. वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्यातून सांगोला शाखा कालव्यात पाणी सोडण्याचा हा प्रकल्प आहे. सांगोला शाखा कालवा प्रकल्पातून सुमारे 21 हजार 525 हेक्टर क्षेत्रास सिंचनाची सुविधा निर्माण होणार होती. केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून सांगोला शाखा प्रकल्पास 742 कोटी 24 लाखांचा निधी मंजूर आहे. केंद्राच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत या कालव्याचे काम सुरू झाले. 103 किलोमिटर लांबीचे काम करण्यात आले आहे. या कालव्याचे बांधकाम ब्रिटिशकालीन असल्याने कालव्याची दुरुस्ती, बांधकामे अस्तरीकरण करणे, कालव्याचे पाणी सांगोल्याच्या शेवटपर्यंत पोचण्यासाठी संपूर्ण अस्तरीकरण करणे यासाठी आमदार शहाजीबापूंनी प्रयत्न केले.
या योजनेतून आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव, सावे, देवळे गावांसाठी 28 कोटी 94 लाखांची बंदिस्त वितरण नलिका मंजूर केली. यातून 2 हजार 159 हेक्टरला लाभ होणार आहे. यलमार मंगेवाडी, अजनाळे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे या गावांसाठी 12 कोटी 18 लाखांची बंदिस्त वितरण नलिका मंजूर आहे. यातून 1 हजार 410 हेक्टरला लाभ होणार आहे.
वाटंबरे, अकोला, कडलास, जवळा गावांसाठी 17 कोटी 39 लाखांची बंदिस्त वितरण नलिका मंजूर असून त्यातून 1 हजार 764 हेक्टरला लाभ होणार आहे.
म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्यासाठी
या प्रकल्पाचे नेमके स्वरूप काय आहे त्यावर एक नजर टाकुया..
म्हैसाळ योजना ही सांगोला तालुक्याच्या विकासाला चालना देणारी योजना आहे. या योजनेतून सांगोल्यासाठी 1.25 टीएमसी पाणी उपलब्ध होते. यातून तब्बल 4 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. डिकसळ, पारे, हबिसेवाडी, नराळे, हंगिरगे, घेरडी, गावडेवाडी, सोनंद या आठ गावांचा या योजनेत समावेश आहे.
वाणी चिंचाळे, वाकी घेरडी, जवळा, भोपसेवाडी, तरंगेवाडी, आगलावेवाडी, मेडशिंगी, पारे, नराळे, सोनंद व घेरडी गावांतील पाझर तलाव व बंधाऱ्यांसाठी अतिरिक्त 1 टीएमसी पाणी मंजूर आहे. जत कालव्यापासून गळवेवाडी बंधाऱ्यात पाणी, सोनंद ते वाढेगाव पर्यंत 14 बंधाऱ्याना याचा फायदा होतो. या योजनेतून सन 2019 ते 2024 या कालावधीत सांगोला तालुक्यासाठी 801.94 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. सांगोला तालुक्यातील बंधारे व नदीसाठी सन 2020 ते 2024 पर्यंत 839.43 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. याशिवाय जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडीत पाणी सोडण्यात आले. याकामी आमदार शहाजीबापू पाटील यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.
माण नदीत टेंभूचे पाणी
सांगोला तालुक्यातील 30 ते 35 गावे प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या गेल्या 50 वर्षांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसत होती. मात्र आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या पाच वर्षांत माण नदीत बारमाही पाणी मिळाले. या योजनेसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सांगोला कालव्यावरील 19 बंदिस्त नलिका वितरिकांची कामे पूर्ण आहेत. यातून 15 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या योजनेमुळे डाळिंब आणि ऊस पिके फुलू लागली आहेत.
परंपरेने दुष्काळी असलेल्या सांगोला तालुक्यात पाण्याचा मुद्दा पुढच्या निवडणुकीत नसेल असा शब्द आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला होता. तो शब्द त्यांनी खरा ठरवला. जवळपास पूर्ण मतदारसंघात पाणी पोहोचेल अशा योजनांची अंमलबजावणी व नियोजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने आमदार शहाजीबापू पाटील यांनी हे साध्य करून दाखविले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच त्यांना सांगोला तालुक्यातील जनता “पाणीदार आमदार” असे संबोधते.