पंढरपूर अर्बन बँक व महाराष्ट्र संशोधन उन्नती संस्थेच्या वतीने परिसंवाद मेळावा संपन्न…!
गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी पंढरपूर अर्बन बँकेचे कर्मयोगी सभागृह येथे अमृत या संस्थेचा परिसंवाद मेळावा व बँकेकडे असणाऱ्या अमृत व्याज परतावा कर्ज योजनेचा शुभारंभ सोहळा पार पडला.
महाराष्ट्र राज्य कार्यविस्तार असणारी सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या दि पंढरपुर अर्बन को ऑप बँकेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या उपक्रम अंतर्गत आण्णासाहेब पाटील, वसंतराव नाईक, महाराष्ट्र राज्य इतर मागास आदी महामंडळांच्या योजना लागू करून व्याज परतावा कर्ज योजनांचा लाभ कर्ज धारकांना होत आहे , त्यामध्येच अमृत या खुल्या प्रवर्गातील घटकांसाठी असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ही बँक कर्ज देण्यास सज्ज झाली आहे. श्रध्येय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या जयंती च्या पूर्वसंध्येला याबाबत अमृत व बँक यांच्यामध्ये करार करण्यात आला व प्राथमिक स्वरूपात लाभार्थी यांना बँकेने कर्ज मंजुरीपत्र प्रदान केले.
अमृत चे व्यवस्थापकीय संचालक श्री विजयजी जोशी यांनी अमृत या संस्थेचा कार्यविस्तार व उद्देशिका बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले व अमृत अंतर्गत असणाऱ्या 21 विविध योजनांची माहिती सविस्तरपणे देऊन त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. काही प्रत्यक्ष लाभार्थी यांचे मनोगत ऐकून त्यांना काही अडचणी आल्या का याबाबत माहिती घेतली व उपस्थितांच्या अनेक शंकांचे समाधान केले व काही मागणी आहेत त्याबाबत आपण सकारत्मक विचार करू असे सांगितले. MPSC/UPSC विद्यार्थी यांचेसाठी योजना अशा प्रकारचे सर्व योजना या अत्यंत सहज व सोप्या भाषेत उपस्थितांना समजेल अशा भाषेत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुरवातीस उद्योगपती रतनजी टाटा व बँकेचे माजी चेअरमन श्री गोपाळराव बेणारे यांच्या पत्नी पुष्पाताई बेणारे यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पंढरपूर बँकेचे सीईओ श्री उमेश विरधे यांनी प्रास्ताविक केले. व्हा.चेअरमन माधुरीताई जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमचे अध्यक्ष पंढरपूर बँकेचे मार्गदर्शक श्री उमेश परिचारक हे होते. ध्रुव अकादमीचे संचालक श्री विनोदजी देशपांडे, बँकेचे सर्व संचालक यांचे प्रमुख उपस्थितीत व खुल्या प्रवर्गातील समाज बांधवांचे उपस्थितीत हा सोहळा यशस्वी पार पडला.