पंढरपूरात भव्य “नोकरी महोत्सवाचे” अनिल दादा सावंत यांच्या शुभहस्ते उद्घाटन
(अनिलदादा यांच्यामुळे आमच्या सर्व नवतरुण पिढीला नोकरीच्या मोठ्या संधी मिळाल्या तरुण-तरुणींच्या प्रतिक्रिया)
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांना नोकरी मिळवुन देण्यासाठी आज पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठ या ठिकाणी ” भव्य नोकरी महोत्सव” चे आयोजन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून हा भव्य नोकरी महोत्सव या भव्य नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या नोकरी महोत्सव मध्ये महाराष्ट्रातील ५० कंपन्या सहभागी झाले आहेत.तर ऑनलाईन अर्ज १००० आले आहेत तर या कंपन्या मधून सुशिक्षित तरुण बेरोजगारांना ४५००
कर्मचारी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे प्रत्येकांस नोकरी मिळणार आहे.या नौकरी महोत्सवात मोठ्या प्रमाणावर तरूण तरूणींचा सहभाग होता.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील तरुणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी मिळावी म्हणून हा नोकरी महोत्सव आयोजित करून अनिल दादा सावंत यांनी तरुण बेरोजगारांची मानसिकता जाणून या बेरोजगार युवकांना नोकरी मिळावी म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे.
या ठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवाराला या ठिकाणी आलेल्या विविध कंपन्यांच्या कडून मुलाखत घेतली जाणार आहे.आणि विविध कंपनीला जे कोणी उमेदवार योग्य असतील त्यांना नोकरीचे नेमणूकीचे पत्र दिले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर अनिल दादा सावंत, संदीप मांडवे, नागेश भोसले, आदित्य फत्तेपुरकर,शाम गोगाव,एम पाटील,अमर सूर्यवंशी, संजय बंदपट्टे, सुधीर अभंगराव, किरण घाडगे,आदी मान्यवर उपस्थित होते.