विधानसभेला एकजुटीने सामोरे जा काँग्रेसची बैठकीत काँग्रेसचे समन्वयक प्रकाशजी घाळे यांचे आवाहन
दि. २३ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व अखिल भारतीय किसान काँग्रेस कमिटी यादरम्यानचे राष्ट्रीय समन्वयक श्री. प्रकाशजी घाळे यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या काँग्रेस भवन येथे महत्त्वाची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या रणनीती विषयी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आलेल्या विविध कार्यकर्त्यांनी आपली मते ठासून मांडली. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.धवलसिंह मोहिते पाटील व खासदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेदरम्यान गदारोळ झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्ते व नेत्यांनी आपल्या तक्रारी श्री.प्रकाश घाळी यांच्या कानावर घातल्या. परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपापसातील अंतर्गत मतभेद विसरून सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाऊन काँग्रेसला भव्य विजय प्राप्त करून देणे हे निष्ठावंत कार्यकर्त्याचे कर्तव्य असून जागा वाटपामध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील व त्या निवडून कशा आणता येतील याबाबत सर्वांनी नियोजन करावे व पक्षाला लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतही घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी रात्रीचा दिवस करावा असे आवाहन श्री.प्रकाश घाळी यांनी याप्रसंगी केले. या बैठकीच्या दरम्यान प्रा.संग्राम चव्हाण यांची सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली करण्यात आली. या नेमणुकीसह जिल्ह्यात इतरही प्रमुख सेलच्या अध्यक्षपदाच्या नेमणुकी जाहीर करण्यात आल्या. सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस कमिटीचे सध्याचे कार्यकारी अध्यक्ष श्री.नंदकुमार पवार वकील यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.यावेळी माजी जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब शेळके, माजी जिल्हाध्यक्ष श्री.दादासाहेब साठे, किसान काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा.संदीप साठे,किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण श्री.रशीद शेख, सौ. अरगडे,श्री.सुधीर लांडे श्री.बाळगी,श्री. चाकोते, श्री.षटगार, मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री.सुलेमान तांबोळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश पवार, अँडव्होकेट खरात, सौदागर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे या वेळेला सर्वांतर्फे अभिनंदन करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.