येत्या दोन दिवसांत मोडनिंब एमआयडीसी मंजूरीचे पत्र मिळणार – आ. बबनराव शिंदे
मिटकलवाडी येथे विविध विकास कामाचे लोकार्पण..
माढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून टेंभुर्णी व कुर्डूवाडी नंतर मोडनिंब, सोलंकरवाडी व बावीच्या माळावर मोडनिंब येथे तिसरी एमआयडीसी उभे करण्यासाठी येत्या दोन दिवसात मंजूरीचे पत्र मिळणार असून मोडनिंब व परिसरातील गावांना याचा मोठा फायदा होणार आहे, असे आ. बबनराव शिंदे यांनी मिटकलवाडी येथे आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी सांगितले.
याप्रसंगी मिटकलवाडी येथे छत्रपती चौक सुशोभीकरण, नवीन वर्गखोली, संरक्षण भिंत बांधणे, ओपन जिम, रस्ता कॉंक्रिटीकरण, लोकरे वस्ती हनुमान मंदिरासमोर सभा मंडप, तांडा वस्ती कॉंक्रिटीकरण, दलित वस्ती कॉंक्रिटीकरण, रोजगार हमी ९५/५ मधून काँक्रीटीकरण, लोकरे वस्ती शाळेसमोर सौर दिवे, बचत गटात भजनी साहित्य व ग्राम संघास टेबल खुर्च्या व कपाट देणे अशा ८३ लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण आमदार बबनराव शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी आ बबनराव शिंदे यांच्या हस्ते सरपंच अर्चना श्रीखंडे व उपसरपंच रवींद्र श्रीखंडे यांचे प्रमुख उपस्थितीत गावातील १८० गरजू महिला व पुरुष लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना व श्रवण बाळ योजनेचे प्रमाणपत्र तसेच पाच विहिरी व दहा गाईगोठे मंजुरीचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विक्रमसिंह शिंदे, संजय पाटील, तुकाराम ढवळे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक भरत चंदनकर, विष्णू हुंबे यांच्यासह संजय पवार, दीपक पाटील, आप्पा पाटील, ब्रह्मदेव मस्के, महादेव घाडगे, माणिक लोकरे, दिलीप भोसले, मोहन लोकरे,मारूती(आप्पा) मिटकल,माणिक मिटकल चेअरमन नवनाथ सुरवसे, संजय मिटकल, संतोष सुरवसे, विष्णू मिस्किन, लक्ष्मण ठेंगल, दत्तात्रय सलगर, राजू देवकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.