पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे पोळा सणासाठी ऊस बिल जमा
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परंपरेप्रमाणे पोळा सणासाठी ऊस बिल बँकेत वर्ग!
श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेली परंपरा आजही जतन
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या परंपरा कारखान्याचे चेअरमन .प्रशांतराव परिचारक जपत असून कारखान्याच्या परंपरेप्रमाणे पोळा सणासाठी गळीत हंगाम 2023-24 मध्ये गाळप झालेल्या ऊसास प्रति मे.टन रु. 50/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हा .चेअरमन .कैलास खुळे व कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, कारखाना स्थापनेपासून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना पोळा सणासाठी पैशाची गरज असल्याने ऊस बिल दिले जात होते. ही परंपरा कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिली आहे. तीच परंपरा व्यवस्थापन जपत असून शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या पोळा सणाला ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. ती गरज ओळखून प्रति मे. टन रु.50/- प्रमाणे ऊस बिल आजच बँकेत वर्ग केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांमधून आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांने गळीत हंगाम 2023-24 मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रति मे. टन रू 2800/- प्रमाणे रक्कम अदा केली आहे. त्याचप्रमाणे आज प्रति मे. टन रुपये 50/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत 2850/- प्रमाणे प्रति मे. टन ऊस बिलाची रक्कम मिळाली आहे. कारखान्याने ऊस उत्पादकांना एफ. आर. पी. पेक्षाही प्रती मे.टन रू. 349/- ज्यादा अदा केलेले आहेत. गळीत हंगाम 2024-25 सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व कामे पूर्ण झाली असून कारखाना गाळपास सज्ज झाला आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक .दिनकरराव मोरे, .वसंतराव देशमुख, .उमेशराव परिचारक, .दिलीपराव चव्हाण, .ज्ञानदेव ढोबळे, .तानाजी वाघमोडे, .बाळासाहेब यलमर, .भगवान चौगुले, .लक्ष्मण धनवडे .भास्कर कसगावडे, .भैरू वाघमारे, .गंगाराम विभुते, .सुदाम मोरे, .विजय जाधव, .हनुमंत कदम, .किसन सरवदे, .दाजी पाटील, .दिलीप गुरव, .सिताराम शिंदे, .शामराव साळुंखे, .राणू पाटील आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.