मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसा निमीत्त मरवडे येथे खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महीलांंचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
सोलापूर जिल्ह्याचे मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसा निमीत्त मरवडे येथे पांडुरंग परिविराच्या वतीने आयोजित केलेल्या न्यु होम मिनीस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमास उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
होममिनीस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमात हजारो महीला सहभागी झाल्या होत्या.
सिनेअभिनेता क्रांतिनाना मळेगावकर व बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांनी उखाणे,गाणी,महीलांचे विवीध खेळ या माध्यमातुन उपस्थित महीलांभगीनींची उत्सफुर्तपणे मने जिंकली.
स्व.कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन सिमाताई परिचारक,भारताताई शिवानंद पाटील,सुनिताताई वाडदेकर,मरवडेच्या सरपंच अंजनाताई चौधरी,तळसंगीच्या सरपंच पुजाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुनम मासाळ,छाया रोंगे,मोहीणी गणपाटील,सुजाता गणपाटील,प्रिया चौगुले,शारदा आकळे,कल्पना पवार,श्रृती कनशेट्टी,विजया जाधव,राणी सांगोलकर,सुप्रिया पाटील,सोनाली पाटील,सुनिता पवार,साधना जाधव,अवंतिका खांडेकर,वनमाला भगरे,सुप्रिया इंगळे,राणी खडतरे,सोनाली पाटील,जनाबाई इंगळे या विवीध क्षेञातील मान्यवर महीलाभगिनी उपस्थित होत्या.
शेकडो महीलांनी खेळ पैठणी कार्यक्रमाच्या विवीध खेळामध्ये उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला होता.
खेळ पैठणीच्या विवीध खेळामध्ये भाग घेतलेल्या महिलामधुन विजेत्या पाच महीलांचे नंबर काढण्यात आले.विज्येत्या महीलांना युटोपीयन शुगर्सचे कार्यकारी संचालक रोहन मालक परिचारक,दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर,धनंजय व्यव्हारे,हाजापुरचे माजी सरपंच माधवानंद आकळे,जालिहाळचे सरपंच सचिन चौगुले,येड्रावचे सरपंच संजय पाटील,पौटचे सरपंच हरी हिप्परकर,मा.आ.प्रशांत परिचारक युवा मंच मरवडेचे अध्यक्ष श्रीकांत गणपाटील आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली.
या खेळात प्रथम क्रमांकाचे बक्षिस एलईडी टिव्ही तळसंगीच्या शुभांगी नितीन म्हारनुर यांनी पटकाविले. द्वितीय क्रमांकाचे बक्षिस फ्रिज तळसंगीच्या पुजा परमेश्वर मुंगसे यांना मिळाले,तृतीय क्रमांकाचे बक्षिस वाशिंग मशीन मंगळवेढ्याच्या निकीता नितीन जाधव यांना मिळले,चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस पिठाची चक्की मरवडेच्या वैष्णवी तेजस गणपाटील यांना मिळाली.पाचव्या क्रमांकाचे बक्षिस शिलाई मशीन भाळवणीच्या मनिषा सुधाकर चव्हाण यांना मिळाली.
याबरोबरच उत्कृष्ट काम करणा-या महीलाभगिनींना उत्तेजनार्थ १०० पैठणी साड्या देण्यात आल्या.तसेच खेळ पैठणीच्या कार्यक्रमास सहभागी झालेल्या सर्वच मायमाऊलींना आकर्षक भेटवस्तु देवुन सन्मानित करण्यात आले.
मा.आ.प्रशांत परिचारक यांनी महीलांच्या सुफ्त कलागुनांना वाव मिळण्यासाठी महीलांना व्यासपिठ करुन दिल्याममुळे महीलांचा आनंद द्विगूणीत झाला होता.खेळामध्ये सहभागी झालेल्या महीलांनी प्रशांत(मालक)परिचारक यांना आशिर्वाद देत आम्ही त्यांना आमदार केल्याशिवाय आता गप्प बसणार न्हाय हे शब्द प्रत्येक मायमाऊलींच्या मुखातुन सर्व काही सांगुन जात होते.
यावेळी युटोपीयन शुगर्सचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक म्हणाले,रोजच्या धावपळीच्या जिवनामध्ये महीला भगिनी आपल्या संसाराची जबाबदारी संभाळुन त्यातुन अविरत वेळ काढुन सणावाराचे दिवस असताना सुध्दा होममिनीस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी माताभगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आनंद घेत आहात ह्यासारखा दुसरा कशातच आनंद नाही.
आपल्या चेह-यावरचा आनंद पाहुन मनाला समाधान वाटले.
यावेळी माजी सरपंच नितीन घुले,सतिश शिंदे,हौसाप्पा शेवडे,नागेश कनशेट्टी,सुरेश पाटील,प्रकाश पवार,सुरेश कोटगोंडे,अशोक पवार,बाळासाहेब सांगोलकर,नवनाथ चौगुले यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.