न्यायालयाने दिला केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला दणका!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

न्यायलयाने दिला केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला दणका!

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेनंतर सहा दिवसांनी रविवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली.

त्याला सोमवारी पोलिसांनी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी न्यायालयाकडे आशिषला चौदा दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला तीन दिवस पोलीस कोठडी घालवावे लागणार आहे. लखीमपूर खीरीतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आशिष हा शनिवारी चौकशीसाठी हजर झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आशिष याची चौकशी केली. पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली ही 9 सदस्यीय एसआयटीने ही चौकशी केली. आशिषला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी त्याला ३ दिवस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने त्याची तात्पुरती न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. सोमवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. ही मागणी न्यायालयानं मान्य केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आशिषने घटना घडली त्यावेळी घटनस्थळापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरील कुस्तीच्या कार्यक्रमात असल्याचे सांगितले. परंतु, त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलीस आणि इतर व्यक्तींनी वस्तुस्थिती समोर आणली. आशिष हा 2 ते 4 या वेळेत कार्यक्रमस्थळी नव्हता. याबद्दल विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. आशिषच्या मोबाईलची टॉवर लोकेशन घटनास्थळावरील दाखवत होती. याबद्दल त्याला विचारले असते त्याने घटनास्थळापासून जवळ असलेल्या राईस मिलमध्ये असल्याचे सांगितले. परंतु. याचा पुरावा त्याच्याकडे नव्हता.

आशिष मिश्रा याच्या गाडीचा ड्रायव्हर हरी ओमने शेतकऱ्यांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत ड्रायव्हर हरी ओमने तो गाडी चालवत असल्याचे म्हटले होते. हरी ओमने त्यावेळी पिवळा कुर्ता घातला होता. परंतु, घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती गाडी चालवताना दिसत आहे. यावर आशिषला उत्तर देता आले नाही. नंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. तसेच, काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अखेर अटक केली, असे सूत्रांनी सांगितले.

मंत्र्याच्या मुलाला अद्याप अटक न झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी पुन्हा आधीचाच पाढा गिरवला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांच्या लखीमपूर खीरीतील घरावर पोलिसांनी पुन्हा नोटीस चिकटवली. त्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने चौकशीसाठी हजर राहावे, अशी ही नोटीस होती. दरम्यान, एक दिवस आधीही सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारला झापले होते. त्यामुळे त्यादिवशीही पोलिसांनी मिश्रांच्या घरावर नोटीस चिकटवली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी लव कुश आणि आशिष पांडे या दोघांनी अटक करण्यात आली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here