लोधी समाजाचा केंद्र सरकारच्या ओबीसी सुचीमध्ये समावेश करा
खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदीय अधिवेशनामध्ये उपस्थित केला प्रश्न
खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्ली येथे संसदीय अधिवेशनामध्ये लोधी समाजाचा केंद्र सरकारच्या ओबीसी सुचीमध्ये समावेश होण्याकरीता प्रश्न विचारला. महाराष्ट्र राज्यामध्ये लोधी समाज हो ओबीसीच्या प्रवर्गामध्ये आहे. परंतू केंद्रामध्ये लोधी समाज ओबीसीच्या सुचीमध्ये नसल्यामुळे लोधी समाजाच्या युवकांना व विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडील NEET, JEE परिक्षामध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. केंद्र सरकारमधील रेल्वे, बी.एस.एन.एल. आर्मी यामध्येही आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेच्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये लोधी समाजाचा केंद्र सरकारच्या ओबीसी सुचीमध्ये समावेश करण्याकरीता प्रश्न विचारला.
यासंदर्भात केंद्र सरकारने लेखी उत्तर दिले असून लोधी समाजाला केंद्र सरकारच्या ओबीसी सुचीमध्ये समावेश करण्याकरीता केंद्र सरकार लवकरच आवश्यक ती पाऊले उचलतील असे उत्तरात सांगण्यात आले आहे.