पंढरपूर युवक कॉंग्रेसच्या आंदोलनानंतर नगरपरिषद प्रशासन झाले जागे!
(०४दिवसांत मिटींग लावून पंढरपुरातील सर्व स्वच्छतागृहाचा प्रश्न लावणार मार्गी नगरपरिषदेच्या अधिकां-यानी दिले आश्वासन)
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून येथे लाखो संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील आसपासचे खेडेगाव येथील महिला व पुरूष येत असतात. एवढे मोठे पंढरपूर शहर असून या शहरात स्थानिक पुढाऱ्यांचे दबावाखाली शहरातील मुताऱ्या पाडण्यात आल्या तसेच सदर मुताऱ्या स्वच्छतेसाठी काढण्यात येणारे टेंडर याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी व प्रत्येक मुतारीच्या स्वच्छतेचे फोटो प्रशासनाने सादर करावेत व महिलांसाठी असणाऱ्या मुताऱ्यांचे ऑडीट करण्यात यावे कारण कागदोपत्री व प्रत्याक्षात मुताऱ्यात यात मोठी तफावत आहे. बाजारपेठेतील भाजी विक्रेत्या महिला, नगरपरिषद गाळेधारक (नगरपरिषदसमोर मुतारी नाही) व तेथील दुकानदार, ग्राहक व बाहेरून येणाऱ्या महिला भाविक यांची मुतारी (स्वच्छतागृह) नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. या मागण्यांसाठी पंढरपूर शहर युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संदिप शिंदे यांच्यावतीने कॉंग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि.०५/०८/२०२४ रोजी पंढरपूर नगरपरिषदेच्या समोर जागरण गोंधळ घालून उपोषण करत आंदोलन करण्यात आले. यानंतर नगरपरिषदेचे अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांशी फोनवरून चर्चा करत तुमच्या मागण्यासंदर्भात संबंधित अधिकारी व आंदोलक यांची ०४ दिवसांत मिटींग लावून तुमचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संदिप शिंदे म्हणाले की, सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे व सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार व कॉंग्रेस कमिटीचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले आहे. बाजारपेठेमध्ये, नगरपरिषद ते एसटी स्टॅंड कडे जाणारा रस्ता, स्टेशन रोड, संत गजानन महाराज पार्कींग व प्रदक्षिणा मार्गावर ६ ते ७मुताऱ्या उभारण्यात याव्यात अशी मागणी केलेली आहे. प्रशासनाने ०४दिवसांत मिटींग लावून सदरचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले असून नगरपरिषद प्रशासनाने जर यानंतरही प्रश्न सोडवला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल त्यानंतर त्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील असा इशारा ही शहराध्यक्ष संदिप शिंदे यांनी दिला आहे.
यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस किशोर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील, किसान कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, किरण घाडगे, सेवा दल शहराध्यक्ष गणेश माने, युवक शहर उपाध्यक्ष रवि अग्रवाल, संग्राम मुळे, अक्षय वनसाळे, महेश अधटराव, नागनाथ अधटराव, सुहास भाळवणकर, आण्णा पवार, रमेश पवार, पांडुरंग इरकल, मिलिंद भोसले, उमेश सर्वगोड, श्रीनिवास उपळकर, विशाल आर्वे, समीर कोळी,दिलीप साबळे,मल्हारी फाळके, शिवकुमार भावलेकर, बाळासाहेब आसबे यांच्यासह बहुसंख्य उपस्थित होते.