जिल्हा नियोजन समितीतून साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी 5 कोटींचा निधीची मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी- मा.आ.प्रशांत परिचारक
पंढरपूर- पंढरपूर शहरात गेली अनेक वर्षापासून साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक उभे राहावे अशी वारंवार मागणी होत होती. पंढरपूर येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे भव्य व दिव्य असे स्मारक उभा करणेसाठी यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी केलेली आहे.
त्याअनुषंगाने पंढरपूर नगरपरिषदे मार्फत साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभा करत आहोत. त्यासंदर्भात पंढरपूर नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच नगरपरिषदे मार्फत स्मारकाचा चबुतरा उभा करणेसाठी नफा फंडातून 15 लाखांचा निधी मंजूर केलेला आहे व त्याचे काम सुरू आहे.
पंढरपूर शहरात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व परिसर सुशोभिकरणासाठी आणखी 5 कोटींचा निधीची आवश्यकता असल्याने जिल्हा नियोजन समिती मधून निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी पालकमंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली असता त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर निधी मंजूर करण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले आहे.