लक्ष्मी टाकळी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी श्री सागर भैय्या सोनवणे यांची निवड
(महेश नाना साठे व सरपंच संजय साठे यांनी केला नूतन उपसरपंच सागर भैय्या सोनवणे यांचा सन्मान)
पंढरपूर तालुक्यातील आणि पंढरपूर शहरालगतच असलेल्या सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून लक्ष्मी टाकळी ची ओळख आहे .दि ३०/०७/२०२४ रोजी सकाळी उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी दोन उमेदवार उपसरपंच पदासाठी रिंगणात उतरले होते सत्ताधारी पार्टी कडुन श्री सागर भैय्या सोनवणे मेंबर आणि विरोधी पक्षांकडून श्री समाधान देठे मेंबर यांनी अर्ज दाखल केले होते.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत चे सरपंच श्री संजय साठे आणि ग्रामविकास अधिकारी श्री जयंत खंडागळे साहेब यांनी काम पाहिले. अतिशय चुरशीच्या लढतीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करून सागर भैय्या सोनवणे यांची लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाली यावेळी सागर भैय्या सोनवणे मेंबर यांना १० मते पडली तर विरोधी पक्षाच्या समाधान देठे मेंबर यांना ०७ मते पडली. यावेळी निवडणूक अधिकारी यांनी जास्त मते घेतलेल्या श्री सागर भैय्या सोनवणे मेंबर यांना विजयी घोषित केले .
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सागर भैय्या सोनवणे मेंबर यांचा सत्कार करण्यात आला जि.प सदस्य,मा. रामदास (आप्पा ) ढोणे, शिवसेना जिल्हा प्रमुख, मा. महेश (नाना) साठे, मा. विष्णुपंत तात्या ताड, मा.चेअरमन महादेव काशीद, मा.नानासो मोरे, मा. विठ्ठल ढोणे, मा दाजी चंदनशिवे, मा. आबासाहेब पवार, मा, सुरेशभाऊ टिकोरे, मा. बिनू नाना खपाले, मा. अनिल सोनवणे,श्री. औदुंबर पोतदार मा.श्री सरपंच संजय तात्या साठे, मा. सरपंच नंदकुमार वाघमारे, ग्रा.पं सदस्य, औदुंबर ढोणे, महादेव पवार, सचिन वाळके, बापू उकरंडे, बापू देवकते,सागर कारंडे, गणेश ढोणे, गणेश चंदनशिवे. दादा धोत्रे, अंकुश ढोणे,ग्रामविकास अधिकारी श्री. जयंत खंडागळे व कर्मचारी वर्ग ग्रा.पं सदस्या, सौ. नागरबाई साठे, सौ आशाबाई देवकते, सौ रेश्मा साठे, सौ. विजयमाला वाळके सौ. रोहिणी साठे. सौ. रुपाली कारंडे इत्यादींवर उपस्थित होते.