सांगोल्यात लाडक्या बहिणीसाठी समिती गठीत, अध्यक्षपदी आ.शहाजीबापूंची निवड
समितीत ११ जणांचा समावेश, दोघांची अशासकीय सदस्यपदी निवड
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी महायुतीचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबविण्यावर सरकारचा भर असून शासनस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सविचांना घेऊन समिती नेमण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिंनींच्या अडचणींचा निपटारा होणार असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार शहाजीबापू पाटील यांची तर सदस्य सचिवपदी तहसीलदार संतोष कणसे यांची नियुक्ती केली आहे. तसेच अशासकीय सदस्यपदी डॉ.पियूष साळुंखे पाटील आणि शिवाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविताना महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत. आता, या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी तसेच ही योजना प्रभावी व सुलभतेने राबविण्यासाठी शासनाने काही बदल केले आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने नवा शासन निर्णय जारी करण्यात आला असून आता विधानसभा क्षेत्रनिहाय समिती नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे, विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिंनींच्या अडचणींचा निपटारा होणार असून दोन अशासकीय सदस्यांचाही या समितीत समावेश केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सांगोल्यात समिती गठीत करण्यात आले असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार शहाजीबापू पाटील यांची तर सदस्य सचिवपदी तहसीलदार संतोष कणसे यांची निवड झाली आहे. तसेच सदस्यपदी मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, समाज कल्याण सहाय्यक अधिकारी महेश जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिजित मोलाने, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री जंबेनाळ, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) चव्हाण तर अशासकीय सदस्यपदी डॉ.पियूष साळुंखे पाटील व शिवाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.