विकासकामांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचा सेवक म्हणून काम करणार – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोल्यात सात कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
राज्यातील महायुतीचे सरकार जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेवून काम करीत असल्याने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. गेल्या पाच वर्षापासून अखंडपणे सांगोला विधानसभा मतदार संघातील गावागावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी समजून घेत आहे. जनतेने आशिर्वाद दिला असल्याने मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विकासकामांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचा सेवक म्हणून काम करीत राहीन अशी ग्वाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोल्याचे शिवसेनेचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मंजूर निधीमधून ५ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या सांगोला-वासुद रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे व १ कोटी ४५ लाख रु. खर्चाच्या सांगोला आठवडा बाजार मटन मार्केट फेज २ या विकासकामांचे भूमिपूजन शिवसेनेचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. तालुक्याचा विकास हेच एकच ध्येय मनाशी बाळगलेले आहे. त्यानुसार निधी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. गेल्या पाच वर्षांत विधानसभा मतदारसंघातील रस्ते, सांस्कृतिक भवन, पाण्याच्या योजना, प्रशासकीय भवन, भुयारी गटार, दुय्यम निबंधक कार्यालय, ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब, शॉपिंग सेंटर, ईदगाह मैदान यासह सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. महायुतीचे सरकार शेतकरी, कष्टकरी, सामन्यातील सामान्यांचा विचार करणारे सरकार आहे. त्यामुळे विकासकामे करत असताना कुठलाही भेदभाव केला जात नसल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, डॉ.प्रदीप साळुंखे पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, उद्योजक बाळासाहेब आसबे, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल पवार, उद्योजक योगेश खटकाळे, माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, अरुण बिले, माजी नगरसेवक अस्मिर तांबोळी, ठेकेदार आनंद खटकाळे, समाधान खटकाळे, शिवसेना विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे, शिवसेना शहरप्रमुख समीर पाटील, पोपट खाटीक, संजय केदार, भालचंद्र भंडारे, अनिल केदार, अजय गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.