विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर करावेत:अँड नंदकुमार पवार
खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू:चेतन नरोटे
सोलापूर शहर व जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कडे आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांनी केले आहे.
राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोंबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ पर्यंत काँग्रेस भवन सोलापूर येथे जमा करावेत
तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर करावेत. असे आवाहन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, व सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी, शहर कार्याध्यक्ष हणमंतू सायबोळु, दत्तु बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, अशोक कलशेट्टी आदी उपस्थित होते.