१ हजार ६७८ शेतकऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदान! आ. बबनदादा शिंदे
वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यावर मिळणार 50 हजार रुपये!
अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद!
जिल्ह्यातील 1हजार 678 शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे 50 हजार रुपये देण्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मान्यता आमदार बबनदादा शिंदे यांची माहिती
शासनामार्फत दोन लाख रुपये कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या 50 हजार रुपये सानुग्रहअनुदान मिळण्यापासून सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 1 हजार 678 शेतकरी वंचित राहिले आहेत. त्या सर्वांना 50 हजार रुपये देण्याविषयी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मान्यता दिली असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
वृत्तान्त असा की शासनाने यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफी जाहीर केली होती, परंतु त्याच वेळेस नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना देखील 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले होते व हे अनुदानाचे पन्नास हजार रुपये सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वी जमा देखील झाले आहेत, परंतु जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 1 हजार 678 शेतकरी 50 हजार रुपयांचे सानुग्रहअनुदान मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. या संदर्भात आमदार बबनदादा शिंदे यांनी वित्तमंत्री व सहकार मंत्री यांचे कडे सातत्याने निवेदन देऊन व पत्र देऊन पाठपुरावा केला होता, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून 50 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देण्याविषयी अर्थमंत्री तसा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मान्यता दिली आहे, तसेच वित्त विभागाच्या मुख्य सचिवांना तसे आदेश देण्यात आले आहेत व त्यानुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक व सोलापूर जिल्हा उपनिबंधक यांचे कडून संबंधित सानुग्रह अनुदान थकीत शेतकऱ्यांच्या विषयी माहिती मागवण्यास कळवण्यात आले असल्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि आवर्जून सांगितले.