शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण ही योजना गावोगावी राबविणार : समाधान काळे
नुकतेच राज्यशासनाचे वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझी लाडकी बहीण ही जाहीर केलेली योजना गावोगावी राबवून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवा गर्जना यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान काळे यांनी सांगीतले.
गावं व तालुका पातळीवर ही योजना दोन्ही संघटनेच्या माध्यमातून महिलांना योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे महसुल विभागाकडून सहज उपलब्ध होणेकरीता पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते गांवोगावी सक्रिय होणार असून जास्तीत जास्त लाभार्थींनी याचा लाभ कसा होईल यासाठी प्रयत्न केले जातील. महिला लाभार्थी ही 21 ते 60 वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या व निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे काळे यांनी सांगीतले.