दुधाला 35 रुपये दर देण्यास शासनाची तत्त्वतः मान्यता!
दूध संघाना प्रति लिटरला 30 रुपये देण्यास बंधनकारक!
तर पाच रुपये प्रति लिटर शासन अनुदान देणार दुग्ध विकास मंत्री नामदार विखे पाटील यांच्या बैठकीत निर्णय:आमदार बबनदादा शिंदे
मागील कित्येक महिन्यापासून दुधाला चाळीस रुपये प्रतिलिटर दर मिळावा म्हणून दूध उत्पादक शेतकरी राज्यभर रस्त्यावर उतरत होते, रस्ता रोको , उपोषण, रस्त्यावर दुधाचा महापूर असे आंदोलन दूध उत्पादक करत आहेत .या संदर्भात मंत्रालयात दुग्धविकास मंत्र्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या आजच्या बैठकीत राज्यातील प्रत्येक दूध संघाने प्रति लिटर 30 रुपये दर देणे बंधनकारक केले असून पाच रुपये प्रति लिटर शासन अनुदान देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दूध संघांसाठी दूध पावडर बनविणेसाठी प्रति किलो तीन रूपये अनुदान देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ताबडतोब निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही नामदार विखे पाटील यांनी याप्रसंगी बैठकीत दिली असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
या बैठकीस आमदार बबनदादा शिंदे यांचे सह माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आमदार विनय कोरे आमदार मोनिका राजळे आमदार संजय मामा शिंदे , माजी आमदार सदाभाऊ खोत दुग्ध विकास आयुक्त प्रसाद मोहोळे राज्यातील विविध दूध संघाचे प्रतिनिधी यांचे सह संबंधित मंत्रालय अधिकारी उपस्थित होते.
चौकट
जनावरे पडताळणीस मुदतवाढ!
लवकरच बंद पडलेले पोर्टल चालू होणार!
विशेष माहिती अशी की राज्य शासनाने दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचे 3 मार्च 24 रोजी जाहीर केले होते परंतु त्यामध्ये राज्यातील प्रत्येक दूध उत्पादकाच्या जनावरांची पडताळणी करून त्याची संपूर्ण माहिती शासनाला 24 मार्चपर्यंत ऑनलाईन कळवण्याची अट घातली होती परंतु ही माहिती भरण्याची पोर्टलच बंद पडले होते. एवढ्या अल्पमुदतीत जनावरांची पडताळणी करणे शक्य नव्हते, त्यातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांनी ही मुदत वाढवून मिळावी व बंद पडलेले पोर्टल तातडीने चालू व्हावे अशी मागणी पत्राद्वारे शासनाकडे केली होती, त्याही विषयावर या बैठकीत चर्चा होऊन यापुढे जनावराच्या पडताळणीची मुदत वाढवण्यात आली असून पोर्टल देखील तातडीने सुरू करण्यात येईल अशी ग्वाही दूध विकास मंत्री महोदयांनी बैठकीत दिली.
आमदार बबनदादा शिंदे माढा