लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न व सहकार्य करावे:आमदार बबनदादा शिंदे
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद
‘माझी लाडकी बहीण ‘या शासनाने जाहीर केलेल्या योजनेनिमित्त आमदार बबनदादा शिंदे यांनी विचार विनिमय करणे व माहिती देण्यासंदर्भात माढा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला असून सोमवार दिनांक 1 जुलैपासून माढा मतदारसंघातील गावागावातून कार्यकर्ते विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यास तत्पर असल्याचे दिसून आले. याप्रसंगी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे माजी सभापती विक्रम दादा शिंदे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे तहसीलदार विनोद रणवरे गटविकास अधिकारी महेश सुळे महिला व बालकल्याण विकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवार आनंद जाधव तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे शंभू मोरे शिवाजीराव पाटील पंढरपूरचे माजी सभापती माने कुर्डूचे अण्णा ढाणे तसेच मतदारसंघातील पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार बबनदादा शिंदे यांनी माझी लाडकी बहिणी ही योजना प्रत्येक गावात घराघरातून राबवून जास्तीत जास्त महिलांचा सहभाग नोंदवावा व त्यांना लाभ मिळवून द्यावा असे आव्हान केले. यावेळी गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी या योजनेसाठी आवश्यक कागदपत्राची माहिती दिली व प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका ग्रामसेवक तलाठी हे मदत करणार असून 21 ते 60 वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता व निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले .तहसीलदार विनोद रणवरे म्हणाले की या योजनेसाठी अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड व बँकेत खाते मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. सर्व अर्ज 15 जुलै पर्यंत ऑनलाईन भरून द्यायचे आहेत तसेच कोणतेही कागदपत्र मिळण्यास अडचण आल्यास तातडीने आमच्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी रणजितसिंह शिंदे म्हणाले की, मतदार संघात समाविष्ट असलेल्या माळशिरस तालुक्यातील 14 गावे व पंढरपूर तालुक्यातील 42 गावा संदर्भात आमदार बबनदादा शिंदे यांनी तेथील गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून नागरिकांना अडचणी येऊ देऊ नयेत असे स्पष्ट शब्दात सांगितलेआहे, तसेच आपल्या चारही साखर कारखान्याचे कर्मचारी गावोगावी येथील कार्यकर्त्यांना व नागरिकांना सहकार्य व मदत करणार आहेत. संबंधित महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्याची केवायसी उत्पन्नाचा दाखला जन्म तारखेचा दाखला या व इतर संबंधित बाबींची पूर्तता करण्यास कार्यकर्त्यांनी तातडीने तयारीला लागावे असेही रणजीत शिंदे आणि आव्हान केले.
या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक विभागीय अधिकारी व सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना देखील गावो गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.