जनहित शेतकरी संघटना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सदैव तयार- नानासाहेब मोरे
शेतकरी संघटनेचे प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जनहित शेतकरी संघटना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सदैव तयार आहे.सर्वसामान्य जनतेला कोणतीही समस्या उद्भवली तर त्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता त्यांची समस्या सोडविण्यासाठी सदैव तयार राहतो. माझ्या वाढदिवसानिमित्त वडवळ गावातील व परिसरातील जनतेने जो माझा सन्मान केला आहे तो मी कधीही विसरणार नाही. भविष्यातही जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तयार आहे. सर्वसामान्य जनतेने कोणतीही प्रशासकीय समस्या असल्यास मला कधीही भेटावे त्यावेळी मी तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात हे न पाहता तुमची समस्या सोडविण्याचा अंतकरणापासून प्रयत्न करीन. असे गौरवोउद्गार आपल्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या सन्मान सोहळ्यात सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. नानासाहेब मोरे यांनी काढले. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांच्या हस्ते श्रीक्षेत्र वडवळ येथे वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बिरुदेव वाघमोडे, घोलप महाराज ,शिवाजी धनवे पाटील, किसन गुंड, भीमराव मोरे पाटील ,संजय बापू मोरे, शिवाजी मोरे ,सूर्याजी मोरे, सचिन चांगभले ,शिवाजी माने, मच्छिंद्र पवार, नागेश गोरे, दत्तात्रय आदमने, भारत आदमने, गणेश मोरे व वडवळ गावातील व परिसरातील सर्व ग्रामस्थ व जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.