राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांचा मोहोळ तालुक्यातील महत्त्वपुर्ण दोरा!
ॲड.पवनकुमार गायकवाड यांच कार्य उत्कृष्ट आमचे पक्ष श्रेष्ठी योग्य निर्णय घेतील: मेहबूब शेख
मोहोळ विधानसभा मतदारसंघा आगामी निवडणुकीत मोठा फेरबदल होणार: महेबूब शेख
मोहोळ तालुक्यातील कामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाकडून “निष्ठावंताचा युवा संवाद” मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.लोकसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट हा आता राज्यातील जेष्ठांना मार्गदर्शन घेत नवतरुण युवकांना सोबत घेऊन राज्यात नवयुवकांची फळी भक्कम करताना दिसत आहे.
त्याच अनुषंगाने मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सोलापूर जिल्ह्याच्या वतीने १० युवक शाखांचे उद्घाटन युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
आगामी निवडणुका दोन ते महिन्यांवर येऊन ठेपल्यात त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या वाढावी सोलापूर जिल्हा हा पुन्हा राष्ट्रवादीमय करण्यातसाठी हा युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांचा दोरा मानला जातोय
यावेळी युवक अध्यक्ष मेहबूब शेख बोलताना म्हणाले की; मा.शरदचंद्र पवार यांच्यापासून अनेक नेते मंडळी आमदार, खासदार झाले अनेक उच्चपदावर पोहचली त्यांनी ऐनवेळी मा.शरदचंद्र पवार साहेब यांना सोडून गेली परंतु राहिले निष्ठावंत पवार साहेबांवर निष्ठावंत लोकांच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले. दिंडोरी खासदार भास्कर भगरे आहेत त्यांची परिस्थिती अतिशय बिकट पेशाने शिक्षक पण मा.शरद पवार यांच्यावर निष्ठा परंतु निष्ठेचे फळ कसं असत पहा परिस्थिती अतिशय बिकट असताना आज ते पक्षाचे “खासदार” झाले ॲड.पवनकुमार गायकवाड यांच काम उत्कृष्ट आहे मा.शरद पवारसाहेब योग्य वेळी योग्य संधी नक्की देतील सोलापूर जिल्हा हा पुन्हा राष्ट्रवादीमय करण्यातसाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत असे सुचक विधान देखील त्यांनी प्रसंगी केले.
यावेळी निष्ठावंताचा युवा संवाद मेळाव्यास जिल्हाअध्यक्ष सोलापूर आदरणीय श्री. बळीराम (काका) साठे व प्रदेशअध्यक्ष आदरणीय श्री. मेहबूब (भाई) शेख, व जिल्हा सरचिटणीस आदरणीय श्री. महेश माने, युवक जिल्हाअध्यक्ष आदरणीय श्री. गणेश पाटील, मोहोळ तालुका अध्यक्ष आदरणीय श्री. विनयकुमार पाटील, आदरणीय श्री. हिंदुराव देशमुख जिल्हाउपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आदरणीय श्री. इरफान पटेल, जेष्ठ नेते श्री. विलास पाटील, युवा नेते श्री. बालाजी लोहकरे, अँड विठोबा पुजारी, अँड. सोनम गायकवाड, डेप्युटी सरपंच श्री. मनोज गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. भास्कर खटके, ग्रामपंचायत सदस्य श्री. फयाज शेख, श्री. भैरवनाथ भोसले, डॉ. श्री. गणेश झेडगे साहेब, अँड. सुयोग मोलाने, श्रीकांत गायकवाड, श्री. राजाभाऊ रसाळ, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.