♦विविध कार्यक्रमांचे आयोजन…
♦लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगांव
तालुक्यातील बोरी (गदाजी) येथे “होलिका पर्वावर” तीन दिवसीय भव्य यात्रा महोत्सव ७ मार्च रोजी सुरु होत असुन गेल्या अनेक वर्षांपासुन ही परंपरा बोरी (गदाजी) येथे अविरतपणे सुरू आहे.
तालुक्यातील बोरी गदाजी येथील “गोटमार यात्रा” ही गेल्या अनेक वर्षापुर्वीपासुनची परंपरा असुन राज्यासह परराज्यात सुद्धा ही यात्रा प्रसिद्ध आहे.गावा शेजारून वाहणाऱ्या छोट्या नदीत गदाजी महाराज यांचे मंदिर असून दरवर्षी होलिका पर्वावर येथे दोन ते तीन दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात येत असते.
धुलीवंदनाच्या दिवशी येथे मंदिर परिसरात प्रसिद्ध गोटमार खेळल्या जाते.मंदिरा शेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात. मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर दगडाने गोटमार करतात तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर दगडाने गोटमार करीत असतात.जवळपास ३ ते ४ तास हा खेळ सुरू असतो.जेव्हा एखाद्या भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात.त्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकरी सांगतात.
गोटमार परंपरा जोपासत ही यात्रा कोरोणा कालावधी सोडला तर सातत्याने भरवल्या जात असुन यावर्षी १ मार्चला घटस्थापणा झाली असून ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गोटमार,दुपारी दोन वाजता दहीहंडी व गोपालकाला यासह ८ मार्च रोजी कीर्तन व श्रीमद् भागवत कथाकार ह.भ.प.वृंदाताई पुणेकर याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.१० मार्च रोजी पाखड पुजा करण्यात येणार असुन या भव्य कार्यक्रमाचा समारोप केला जाणार आहे.
दरम्यान यात्रा आयोजनाची तयारी पुर्ण झाल्याची माहीती असुन समस्त भाविकांनी दर्शन व यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.