कुर्डुवाडी येथील एमआयडीसी लवकरच कार्यान्वित होणार:- आ संजयमामा शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कुर्डुवाडी येथील एमआयडीसी लवकरच कार्यान्वित होणार:- आ संजयमामा शिंदे

सोलापूर // प्रतिनिधी

०२/०९/२०२१ – मांगी रस्त्यावरती १९९७ साली प्रस्तावित झालेल्या एमआयडीसी चे काम वर्षानुवर्षे रेंगाळलेले होते. सदर ठिकाणी शासनाने ५० हेक्‍टर क्षेत्र एमआयडीसीसाठी संपादित केलेली असून सध्या त्या ठिकाणी फक्त आयटीआय ची इमारत व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे एक उपकेंद्र सुरु आहे. पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी इतर कोणतेही उद्योगधंदे सुरू होऊ शकले नाहीत. उद्योगधंद्यासाठी आवश्यक असलेली सेवा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सदर काम रेंगाळले होते. या कामांना प्रारंभ केलेला असून एमआयडीसी लवकरच कार्यान्वित करू असा विश्वास आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

एमआयडीसीच्या शेजारून जाणारा महामार्ग तसेच केंद्र शासनाच्या प्रस्तावित असलेल्या दक्षिण भारत ते उत्तर भारत या नियोजित रस्त्यांची अडचण आता सुटलेली असून बांधकाम विभागाकडून व पर्यावरण मंत्रालयाकडून तसे पत्र मिळाल्यामुळे एमआयडीसीमध्ये सध्या वेगाने कामे सुरू आहेत. रस्ते ,वीज , पाणी यांची पूर्तता लवकरच करून बाहेरील उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असलेले वातावरण आपण या ठिकाणी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार शिंदे यांनी याविषयी बोलताना सांगितले.

सध्या रस्त्यांची कामे एमआयडीसी मध्ये सुरु असून उर्वरित कामे ही लवकरच पूर्ण होतील आणि त्यानंतर एमआयडीसी कार्यान्वित होईल. यादरम्यान शासन निर्देशानुसार प्लॉटचे वितरण केले जाणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here