
७० वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या शाळेचे पुनबांधकाम करण्यासाठी निधी मिळावा: रमेश माने
(पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी निवेदन)
मोहोळ तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जवळजवळ 70 वर्षे जुनी इमारत ही जीर्ण झाले असून त्या शाळेला जवळजवळ १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्याच अनुषंगाने या जुन्या झालेल्या शाळेच्या वर्ग खोल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या वर्ग खोल्यांसाठी व नवीन वर्ग बांधणीसाठी मोहोळ दक्षिण मंडलाचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांच्याकडे, एक निवेदन सादर केले असून, त्यामध्ये त्यांनी या जवळजवळ गावातील १०० वर्ष झालेल्या शाळेला व ७० वर्ष जुने बांधकाम असलेल्या वर्ग खोल्यांसाठी निधीची मागणी केली आहे.
यामध्ये या जीर्ण झालेल्या इमारतीचे बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधकाम व नवीन खोल्या बांधणे त्याचबरोबर अनेक शालेय उपायोजना करण्यासाठी मागणीचे पत्र माने यांनी दिले असून यामुळे पेनुर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना अनेक सोयीसुविधा मिळू शकतात व त्यांच्या शैक्षणिक गरजा अडचणी दूर होऊ शकतात यासाठी रमेश लक्ष्मण माने तालुकाध्यक्ष मोहोळ दक्षिण मंडल यांनी निवेदन सादर केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महत्वपूर्ण असून या सर्व शाळा व रस्त्यांना निधी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
जयकुमार (भाऊ) गोरे
ग्रामविकास व पंचायत राजमंत्री महाराष्ट्र राज्य