
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली सुविधांची पाहणी
अंतीम टप्प्यातील सुविधांवर पालकमंत्री समाधानी
सोलापूर solapur राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे Palakmantri Jayakumar Gore यांनी आज वेळापूर, माळशिरस, नातेपुते येथील पालखी तळाची पाहणी केली.
जर्मन हॅंगर मंडपासह, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, हिरकणी कक्ष यांची पाहणी केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे समवेत माजी आमदार राम सातपुते, माळशिरसचे मा.नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सुविधांची माहिती दिली.
पालकमंत्री यांनी पालखी येणे ची पुर्वी एक दिवस अगोदर सर्व सुविधा सज्ज ठेवा. अशा सुचना केल्या.
निमगाव केतकी तालुका इंदापूर येथे दाखल झालेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन सर्व वारकरी बांधवांचे ना.जयकुमार गोरे यांनी स्वागत केले.
पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांसोबत संवाद साधला.