४ कोटी ५ लक्ष रुपयांच्या रस्ते कामांचा भूमिपूजन समारंभ !
(मौजे बैरागवाडी, जाधव वाडी सोलंकरवाडी व भुताष्टे येथील ग्रामस्थांनी केला रणजित(भैया) शिंदे यांचा सन्मान)
मौजे – बैरागवाडी, जाधववाडी (मो), सोलंकरवाडी व भुताष्टे येथील ४ कोटी ५ लक्ष रुपयांच्या रस्त्यासाठी आदरणीय दादांनी २०२३ च्या विधीमंडळ अधिवेशनातील अर्थ संकल्पामध्ये मंजूरी घेतलेल्या रस्त्याच्या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून रस्ते कामांचे भूमिपूजन करत उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. त्याचबरोबर भुताष्टे येथील लोकांचे कुणबीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मराठा बांधवांच्या कुणबी प्रमाणपत्राचे वाटप माझ्याहस्ते करण्यात आले.
यामध्ये बैरागवाडी ते मोडनिंब – करकंब रस्त्यासाठी ३० लक्ष रु, जाधववाडी ते मोडनिंब – करकंब रस्त्यासाठी १ कोटी रु., सोलंकरवाडी ते नॅशनल हायवे रस्त्यासाठी २ कोटी रु., भुताष्टे ते व्यवहारी मळा रस्त्यासाठी गट ब मधून ७५ लक्ष रुपये अशा एकूण ४ कोटी ५ लक्ष रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
रस्ते विकासाच्या कामांमुळे सर्वसमावेशक विकासाच्या प्रक्रियेला गती येणार असून उत्तम दर्जाचे रस्ते असल्यामुळे दळणवळण व वाहतूक सुविधेला वाव मिळणार आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवास सुखकर होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी बैरागवाडी येथे मा. जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडू नाना ढवळे, मा. सरपंच औदुंबर तात्या सुर्वे, सरपंच लक्ष्मण पाटोळे, मा. सरपंच गणेश सुर्वे, उपसरपंच गणेश बाळासाहेब सुर्वे, मार्केट कमिटीचे संचालक सतीश सुर्वे, पी.डब्ल्यू.डी.चे उपअभियंता हेळकर साहेब, मोडनिंबचे मा. सरपंच चांगदेव वरवडे, दत्ता बापू सुर्वे, जाधववाडी येथे सरपंच राहुल जाधव, मा. सरपंच गणेश महाडिक, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक हनुमंत तात्या घाडगे, तुळशीचे सरपंच शरद मोरे, मा. सरपंच दिगंबर माळी, सोलंकरवाडी येथे जि.प. सदस्य शंभूराजे मोरे,खरेदी विक्री संघाचे संचालक नागनाथ माळी, बाबासाहेब पांढरे, भुताष्टे येथे शहाजी अप्पा यादव, बाळासाहेब व्यवहारे, उपअभियंता हांडे साहेब, विजय यादव, सुरेश यादव, दिलीप यादव, सुधीर यादव, अनिल यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.