
१० ऑगस्ट रोजी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध निवडीसाठी मुलाखती पार पडणार!
(राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार!)
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी निवडीसाठी रविवारी मुलाखती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत, सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने, तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी, शहर अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणीत, तालुका कार्यकारिणीतील पदांसाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
या मुलाखती दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते मुलाखती संपेपर्यंत, शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर येथे, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.
सर्व तालुका व विधानसभा अध्यक्षपदासाठी, शहर अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणीसाठी इच्छुक कार्यकर्ते जिल्हा कार्यकारिणी मध्ये व तालुका कार्यकारिणीमध्ये काम करण्याची इच्छुक असलेले पदाधिकारी त्याच प्रमाणे ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्याक सेल, महिला आघाडी, युवक आघाडी, किसान सेल, कामगार विभाग, अनुसूचित जाती जमाती सेल, लिगल सेल, वैद्यकीय सेल, सेवा दल विभाग, उद्योग व व्यापारी सेल, माहिती तंत्रज्ञान सेल, सोशल मीडिया सेल, विद्यार्थी सेल, मीडिया / प्रसिद्धी विभाग, निवडणूक व प्रशिक्षण सेल, इतर सर्व फ्रंटल सेल्स व विशेष विभाग, प्रवक्ता विभाग, मच्छिमार सेल, रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग, किल्ला संवर्धन कक्ष, हिंदी भाषिक सेल, माजी सैनिक विभाग, वैद्यकीय मदत कक्ष, पदवीधर विभाग, नगर परिषद/नगर पंचायत कर्मचारी संघटना सेल, महापालिका कर्मचारी सेल, वाहतूक/मोटार मालक/कामगार संघटना सेल, असंघटित कामगार सेल, माध्यम विभाग (Media IT Cell), वृत्तपत्र व प्रकाशन विभाग, अपंगत्व कक्ष, अभियंता सेल, ज्येष्ठ नागरिक संघ, सफाई कामगार सेल, वक्ता प्रशिक्षण विभाग, सार्वजनिक ग्रंथालय कक्ष, सहकारी सेल, असंघटित कामगार सेल.
या सर्व विभागात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कार्यकत्यांनी देखील उपस्थितीत राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले आहे.