श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग दाखल

सोलापूर // प्रतिनिधी

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2020 – 21 मध्ये गाळप केलेल्या उसास यापूर्वी पहिला हप्ता रुपये 2100 प्रमाणे आदा केलेला असून आज रोजी रुपये 131 प्रति मे.टन प्रमाणे दुसरा हप्ताची एकूण रक्कम रुपये 14 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलेली आहे. गळीत हंगाम 2020 -21 मध्ये गाळपास आलेल्या उसाचे एकंदरीत प्रति टन रुपये 2231 प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना आदा केलेली आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी साहेब यांनी दिली.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्याचे आमदार श्री प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून गाळप हंगाम 2020 -21 मध्ये कारखान्याने 10,06,770 मे. टन ऊस गाळप करून 11.44% सरासरी साखर उताराने 11 लाख 13 हजार 500 क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन कारखान्याने उद्दिष्टपूर्ती केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी covid-19 या परिस्थितीमुळे आर्थिक संकटात असताना श्री पांडुरंग कारखान्याने मात्र गळीत हंगाम 2020-21मध्ये गाळप केलेल्या उसास दुसरा हप्ता प्रति टन 131 प्रमाणे ऊस बिल दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील हंगाम पुर्व मशागतीचे कामे करण्याकरिता आर्थीक मदत होणार आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
गाळप हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या FRP धोरणानुसार कारखान्याची FRP रुपये 2431 प्रति मे टन असून कारखान्याने या गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसास रक्कम रु.2231 प्रति मे टन अदा केले असुन उर्वरित FRP रक्कमही लवकरच देणार आहे.
गळीत हंगाम 2021- 22 साठी कारखान्याकडे जवळपास 14 हजार हेक्टर ऊसाची नोंद असुन यामधुन 11 ते 12 लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेले आहे. गळीत हंगाम 2021- 22 सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्यांमधील कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पूर्ण होऊन गाळप हंगाम वेळेवर सुरू केला जाणार आहे त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षम पणे उभारली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here