विडी उद्योग वाचविण्यासाठी कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विडी उद्योग वाचविण्यासाठी कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने.

 

सोलापूर // प्रतिनिधी 

मुंबई उच्च न्यायालयात विडी उद्योगा विरुध्द करण्यात आलेल्या जनहित याचिका अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दाखल करण्यात येणाऱ्या शपथ पत्रात विडी विक्रीवर बंदी इ गाल्यास विडी उद्योगातील सुमारे ५ लाख कामगार बेकार होऊन कामगारांच्या कुटुबियांसह ५० लाख जनतेवर उपासमारीची वेळ येणार आहे . या परिस्थितीची पुर्णपणे माहिती शपथ पत्रात उल्लेख करावे . या मागणीसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आले . यात राष्ट्रीय विडी मजूदर संघ व नवनिर्माण महाराष्ट्र कामगार संघटना सहभाग नोंदविला .
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शने कार्यक्रमात विडी कामगार एकजुटीचा विजयी असो , विडी उद्योगाबाबत सत्य परिस्थिती शपथ पत्रात नोंद झालीच पाहिजे , धुम्रपान कायद्यातुन विडी उद्योगाला वगळलेच पाहिजे , स्नेहा मारजाडी मुर्दाबाद , सरकारचे काम आहे विडी कामगरांचे धाम आहे , मा . आरोग्य मंत्री व कामगार मंत्री काय करतात ? राजकारण सोडून दुसरे काय करतात . अशा घोषणा दिल्या . निदर्शने कार्यक्रमा प्रसंगी विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्यासह सायबण्णा तेग्गेळ्ळी , राहुल गुजर , श्रीनिवास चिलवेरी यांनी धुम्रपान कायदा विरोधात केंद्र सरकारवर जोरदार टिका केली . त्यानंतर मा . जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले . निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विष्णु कामरपुरी ( महाराज ) यांच्यासह सायबण्णा तेग्गेळी , राहुल गुजर , श्रीनिवास चिलवेरी , दशरथ नंदाल , चंद्रकला गुजर , रेखा आडकी यांचा समावेश होता . सदर निदर्शने कार्यक्रमास महिला विडी कामगार मोठ्या संख्येने सामील झाले होते .
सदर निदर्शने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुमताज सय्यद , लक्ष्मीबाई ईप्पा , मिराबाई लच्छुवाले , गौरी पल्ले , श्रीनिवास बोगा , गुरूनाथ कोळी , गणेश म्हंता , विठ्ठल कु-हाडकर , प्रशांत जक्का , प्रसाद जगताप , संतोष जाधव, अर्थना चिलका , संध्याराणी कुऱ्हाडकर , अनिता बटगिरी , शोभा पोला यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी विशेष प्रयत्न केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here