दिलीप कुमार यांचं निधन, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दिलीप कुमार यांचं निधन, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचे डॉ.जलील पारकार यांनी ही माहिती दिली. आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या जुहूमधल्या कबरस्तानात त्यांचं दफन करण्यात येईल.

बुधवारी (7 जुलै) सकाळी 7.30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं पारकर यांनी सांगितलं. वृद्धापकाळातील समस्यांमुळे दिलीप कुमार यांचे निधन झाल्याचं डॉ. पारकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या महिन्यात सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दिलीप कुमार यांना रविवारी (6 जून) सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here