जुलै महिन्याचे नियतन प्राप्त

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जुलै महिन्याचे नियतन प्राप्त

सोलापूर // प्रतिनिधी 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी जुलै 2021 या महिन्याचे सोलापूर शहरासाठीचे गहू, तांदळाचे नियतन प्राप्त झाल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

अंत्योदय अन्न योजनेत 6 हजार 121 शिधापत्रिका असून गहू प्रती कार्ड 25 किलोप्रमाणे 1530.25 क्विंटल तर 612.10 क्विंटल तांदूळ प्रती कार्ड 10 किलो नियतन मंजूर झाले आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या चार लाख 86 हजार 420 एवढी असून गहू प्रती लाभार्थी तीन किलोप्रमाणे 14592.60 क्विंटल तर तांदूळ प्रती लाभार्थी 2 किलोप्रमाणे 9728.40 क्विंटल धान्य प्राप्त झाल्याची माहितीही श्री. समिंदर यांनी दिली.

पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्याची जबाबदारी रास्तभाव दुकानदार यांची राहणार असून धान्याचे वितरण ई-पॉस मशिनद्वारे होणार असल्याचे श्री. समिंदर यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here