दरम्यान, २६ जानेवारी २०२२ रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक क्रमांक केए ३२ बी १७७७, कार क्रमांक एमएच २५ एएल ४०७०, बलकर ट्रक क्रमांक एमएच १२ सीएक्स ११७१ व ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ यांचा एकामागून एक धडक देऊन अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दासरी, वाळूनजकार, बनकर, गायकवाड, होनमोरे, मोरे, सूर्यवंशी, काळोखे हे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी क्रेनने कार व ट्रक मधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान, अपघातातील मदतीचे कार्य दोन तास सुरू होते.
दरम्यान, ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ मध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता हॉस्पिटलला दाखल केले आहे. वेळेत मदतकार्य झाल्याने जीवित हानी टाळणे शक्य झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.