ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे समन्वयक मा, प्रकाशजी घाळे साहेब यांचा आज पंढरपूर येथे नियोजित दौरा होता या दोन दिवसाच्या दौऱ्याप्रसंगी, ते पंढरपूर येथे आले असता त्यांनी आज श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतले.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार बालाजी पांडुरंग पुदलवाड, यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा देऊन यथोचित त्यांचा सन्मान केला.
यावेळी त्यांच्यासोबत, पंढरपूर काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष अँड राजेश भादुले,पश्चिम महाराष्ट्र किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, काँग्रेसचे वरिष्ठ तालुका उपाध्यक्ष राहुल पाटील, प्रकाशजी घाळी यांचे राजकीय सल्लागार संजयजी चौगुले, पंढरपूर तालुका किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, ओबीसी माजी जिल्हा अध्यक्ष समीर कोळी, शिवाजी धोत्रे, बाळासाहेब आसबे,संपादक, प्रसाद कुलकर्णी, पत्रकार मंदार सर, आधी सर्व मान्यवर यावेळी मंदिर समितीच्या कार्यालयामध्ये उपस्थित होते.