यंदाच्या आषाढी सोहळ्यात पायी दिंडी सोहळ्याला निर्बंध चालतील बंदी नको : वारकरी संप्रदाय | Aashadhi Palkhi Sohla

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर – कोरोनामुळे गतवर्षीची आषाढी यात्रा अगदी मोजक्याच भाविकांमध्ये पार पडली होती. तर पायी पालखी सोहळ्यावर शासनाने बंदी घातली होती. यंदा मात्र 20 जुलै रोजी आषाढी एकादशी असून 1 जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे. यातच वारकरी संप्रदायाने यंदा अतिशय मर्यादित स्वरूपात वारकऱ्यांना पायी पालखी सोहळ्यासाठी परवानगी द्यावी, आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी पालखी सोहळा पंढरपूरपर्यंत आणू अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here