राजर्षी शाहू महाराजांनी सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले.-स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे स्वेरीत राजर्षी शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन साजरा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- ब्रिटीश राजसत्तेचा अंमल असताना सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नती साठी आपले जीवन वेचणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेत शिक्षणसमाजकारण आणि राजकारण याचबरोबर शेतकरी व प्रजेच्या हितासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे प्रशासकीय कार्यक्रमात छत्रपती राजर्षी शाहू महाराजमहात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते.’ असे प्रतिपादन गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले.

       स्वेरीमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिन प्रसंगी श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगेस्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवारबी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियारसंशोधन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डेप्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटीलइलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवारट्रेनिंग कार्पोरेटचे प्रा. विक्रम चव्हाणप्रसिद्धी विभाग अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरीप्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवेडॉ.व्ही.जी. काळेप्रा. संदिपराज साळुंखेप्रा. श्रीकृष्ण भोसलेइलेक्ट्रीकल सुपरवायझर संतोष जाधव यांच्यासह इतर प्राध्यापकशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त शंभर सेकंद एका जागी स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here