नुकतंच मुंबईसह १८ महनगरपालिका आणि जि.प. निवडणुकांचा कार्यक्रम येत्या १५ दिवसांमध्ये जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला.
सोलापूर जिल्ह्याला येत्या 7 मे 2022 रोजी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात
सर्वोच्च न्यायालयाच्या दि.०४/०५/२०२२ रोजीच्या निर्णयात नमूद केले आहे की, दि. ११/०३/२०२२ रोजीच्या अधिनियमातील सुधारणा अस्तित्वात येण्यापूर्वी दि.१०/०३/२०२२ रोजी असलेली प्रभाग रचनेची कार्यवाही ज्या टप्प्यावर होती तेथपासून पुढे आयोगाने कार्यवाही चालू ठेवावी. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचे कामकाज खालील नमूद कार्यवाही करण्यात येत आहे:
१) नकाशे गुगल नकाशावर सुपर इंपोज करणे २) जनगणनेची आकडेवारी लिंक करणे इत्यादी.
तरी उपरोक्त कामकाजाकरिता आपल्या कार्यालयातील प्रभाग रचनेचे कामकाज हाताळणारे एक अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे तसेच जनगणनेची आकडेवारी, निवडणूक विभाग/ निर्वाचक गणाची गावनिहाय आकडेवारी आणि नकाशे (सॉफ्ट कॉपीसह) सोबत जोडलेल्या तक्त्यामधील नमूद दिनांकास कार्यालयीन वेळेत आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना संबंधिताना द्याव्यात.