सोमवारी आठवडा बाजार दिवशी भूमी अभिलेख कार्यालयात शुकशुकाट (शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक लवकरात लवकर थांबवावी तालुकाध्यक्ष राजु स्वामी)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना त्यांच्या कामासाठी अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत हे त्वरित थांबवावेत अन्यथा जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील,शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी व जिल्हा उपाध्यक्ष आश्विनी ताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आंदोलन उभा करणारं असल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी उप विभागीय अधिकारी यांच्याकडे केलं आहे.
भुमिअभिलेख कार्यालयामध्ये विविध कामासाठी शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. याची खातरजमा करण्यासाठी कार्यालयात गेलो असता त्या ठिकाणी बरेच अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. विचारले असता रजेवर आहेत असे सांगण्यात आले. भूमी अभिलेख कार्यालयात उप अधिक्षक म्हणून गवळी मॅडम कार्यभार पाहत आहेत ते ही उपस्थित नव्हते ते ही रजेवर आहेत असे सांगण्यात आले. त्यांना संपर्क करण्यासाठी फोन केला असता त्यांनी कॉल उचलला नाही.
उप विभागीय अधिकारी यांना कॉल केला असता तक्रार करा योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.आज रोजी भूमी अभिलेख कार्यालयात जावून गवळी मॅडम यांची भेट घेतली असता दोन तारखेला कोण कोण रजेवर होते याची चौकशी केली त्या ठिकाणी तांबोळी सर व नदाफ मॅडम यांनी रजेची मागणी टपाला द्वारे केल्याचे आढळून आले.यापुढे असे सहन करणार नाही तसेच सोमवारी सर्व कर्मचार्यानी उपस्थित राहण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली.
जमीन एकत्रीकरण चे प्रकरणासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच वर्षे झाली हेलपाटे मारावे लागत आहेत. मुळातच हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे निर्माण झाला आहे परंतु याची सजा शेतकरी भोगत आहेत. मोजणी चे प्रलंबित प्रकरणे असतील तसेच नकाशाच्या नकला असतील हे प्रश्न ताबडतोब मार्गी लावावेत.अशी मागणी करण्यात आली.
सोमवारी मंगळवेढा येथे मोठा आठवडा बाजार भरतो.तालुक्यातील शेतकरी तसेच नागरिक सोमवारी बाजार आणि शासकीय कार्यालयातील कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तालुक्याला येत असतात .जर त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित राहत नसतील तर त्यांचे प्रश्न सुटणार कसे,अगोदरच कोरोना मुळे बरेच प्रश्न रखडलेले आहेत .त्यामुळे सोमवारी सर्व कर्मचारी उपस्थित राहून प्रश्न सोडवण्याची मागणी उप विभागीय अधिकारी यांच्या कडे करण्यात आली. यावेळी प्रहारचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र सावंत, शहर अध्यक्ष सचिन साळुंखे , प्रहारचे कार्यध्यक्ष अमोगसिद्ध काकणकी,भोसे गट विभाग प्रमुख चेतन वाघमोडे, बोराळे विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर , ज्ञानेश्वर पांढरे, दत्ता पांढरे, विठ्ठल चौगुले फैय्याज मुलानी, अमोल थडगे ,आप्पा आसबे ,महेश तळे,समर्थ आसबे,संतोष खडतरे, शशी कोळी, पंपु गवळी,राजकुमार स्वामी तसेच इतरही शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here